आयपीएल रंगात आलेलं आहे. काही संघांनी चांगली कामगिरी केली तर काही संघांना अपयशाला सामोरं जावं लागलं. एका संघाच्या यशात आणि अपयशात कर्णधाराचा मोठा वाटा असतो, या आयपीएलमध्येदेखील असे अनेक कर्णधार आहेत ज्यांनी त्यांच्या नेतृत्व कौशल्याने, रणनीतीने आणि योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेने प्रभावित केलं आहे. भारतीय T20 संघाच्या कर्णधारपदाची जागा रिक्त आहे. सूर्यकुमार यादव याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याआधी भारतीय संघाचा प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्ता अजित अगरकरने सांगितले होते की सूर्यकुमार यादव फक्त 2026च्या T20 विश्वचषकापर्यंतच कर्णधार असेल, मग कर्णधारपदाची धुरा शुभमन गिल सांभाळेल. पण, 2026च्या T20 विश्वचषकातून वगळल्या गेल्यानंतर गिलची संघातली जागा निश्चित नाही. त्यामुळे गिल व्यतिरिक्त असे कोण खेळाडू आहेत ज्यांची भारतीय T20 संघाच्या कर्णधारपदी वर्णी लागू शकते.
1. श्रेयस अय्यर –
श्रेयस अय्यर भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे. तो भारतीय क्रिकेटमध्ये एकच कर्णधार आहे ज्याने आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन्ही जिंकल्या आहेत. त्याने 2026 मध्ये कोलकाताला घेऊन जिंकला होता, 2025मध्ये पंजाबला 11 वर्षांनी अंतिम फेरीत नेले. यावर्षी पहिल्या पाच सामन्यात पंजाबची कामगिरी उत्तम आहे. वैयक्तिक कामगिरी विषयी बोलायचं गेलं तर अय्यरने फलंदाजीदेखील उत्तमच केली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर भरतीय T20 संघाचा कर्णधार होण्याच्या शक्यता जास्त आहे.
2. रजत पाटीदार –
रजत पाटीदार आरसीबीला ट्रॉफी जिंकवून देईल असा कोणी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता, मात्र ज्याचा कोणी विचारदेखील केला नव्हता ते त्याने करून दाखवलं. त्याने गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये आणि यावर्षीच्या आयपीएलच्या सुरुवातीला फलंदाजीत चांगली कामगिरीदेखील केली. त्याने 2024/25 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मध्यप्रदेशला अंतिम फेरीतदेखील नेले होते. पण रजत अजून भारतासाठी एकही T20 सामना खेळेल नाही आहे, पण रजतच्या आयुष्यात अशा अनेक चमत्कारिक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे तो आरसीबीच्या संघात लवनीथ सिसोदिया दुखापतग्रस्त झाला म्हणून आला होता आणि त्यानंतर काय घडलं ते सगळ्यांनाच माहीत आहे.
हेही वाचा – Players Injury Update: स्टार खेळाडूंच्या दुखापतींनी वाढले फ्रँचायझींचे टेन्शन; जाणून घ्या रोहित-विराटसह 5 बड्या खेळाडूंचे फिटनेस अपडेट
3. ईशान किशन –
आयुष्यात किती संघर्ष येऊ देत, पण पुनरागमन हे ईशान किशनसारखंच असावं असं अलीकडच्या काळात सामाजिक माध्यमांमध्ये सहज म्हटलं जातं. ईशान किशनने जे करून दाखवलं ते काही चमत्कारापेक्षा कमी नाही. जेव्हापासून ईशानचे भारतीय संघात पुनरागमन झाले तेव्हापासून त्याने उत्कृष्ट कामगिरी केली.
तो आता हैदराबादचा कर्णधारदेखील आहे. हैदराबादचा संघ ऑनपेपर इतर संघांपेक्षा हलका वाटतो, पण त्या संघाकडूनदेखील त्यांनी समाधानपूर्वक कामगिरी करून घेतली. त्याची भारतीय संघात जागादेखील निश्चित आहे. त्यामुळे येत्याकाळात भारतीय संघाची धुरा त्याच्याकडे येऊ शकते.
हेही वाचा – Mumbai Indians Downfall | मुंबई इंडियन्सचं चुकतंय तरी काय ? का लागली संघाला उतरती कळा ?
4. अभिषेक शर्मा –
अभिषेक शर्मा सध्या हैदराबादचा उपकर्णधार आहे, जेव्हा तो पंजाबसाठी घरगुती क्रिकेट खेळतो तेव्हा कोणताही फॉरमॅट असो तो कर्णधारच असतो. तो पंजाब संघाचा १६ वर्षांखालील संघापासून कर्णधार आहे. त्याला कर्णधारपदाचा दांडगा अनुभव आहे. संघातली त्याची जागादेखील निश्चित आहे. 2024 मध्ये हार्दिक पांड्या रोहित शर्मानंतर T20 संघाचा कर्णधार होणार होता हे निश्चित होतं, मात्र वर्णी लागली ती सूर्यकुमार यादवची. तसं काहीतरी यावेळी घडलं तर अभिषेकाला नक्कीच संधी मिळेल.